राष्ट्रीय शैक्षणिक धोरि 2020: शालेय णशक्षिाची गुिवत्ता आणि राष्ट्रीय णिशन

Authors

  • डॉ. संगीता बाबुराव भालेराव

DOI:

https://doi.org/10.8476/sampreshan.v17i3.258

Keywords:

शालेय शिक्षण, बालसंगोपन, गुणवत्ता, शालेय शिक्षणातील गुणात्मक वाढ, भाषिक संरचना, तांत्रिक ज्ञान, अभ्यासक्रम सुधारणा

Abstract

नवीन धोरणामध्ये शालेय शिक्षणाचा दर्जा श्रेष्ठतम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्ञान हे केवळ अभ्यासासाठी आणि परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी नाही तर त्यांचे तार्किक, सर्जनशील, नैतिक विचार विकसित करण्यासाठी आहे. शालेय स्तरावर अनेक चांगले बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे अत्यंत क्रांतिकारी असे धोरण मानले जाते. अनेक नवीन बदल यात आपणास पहावयास मिळत आहेत.

शैक्षणिक परिणामांची सध्याची स्थिती आणि खरोखर काय आवश्यक आहे यामधील अंतर कमी करण्यासाठी, वर्गातील व्यवहार सक्षमतेवर आधारित शिक्षण आणि शिक्षणाकडे वळले पाहिजेत. मूल्यांकन साधने देखील दिलेल्या वर्गाच्या शिक्षण परिणामांशी संरेखित करणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी, सर्व टप्प्यांवर, अनुभवात्मक शिक्षणाचा अवलंब करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये कला एकात्मिक आणि क्रीडा एकात्मिक शिक्षण, कथाकथनावर आधारित अध्यापनशास्त्र, इतरांसह, प्रत्येक विषयातील मानक अध्यापनशास्त्र आणि विविध विषयांमधील संबंधांचे अन्वेषण यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 यामध्ये शालेय स्तरावर नवीन प्रारूप आखण्यात आले आणि जे घटक आतापर्यंत दुर्लक्षित होते त्या घटकांचाही समावेश मुलभूत शिक्षणात करण्यात आला आहे. शालेय स्तरावर अभ्यासक्रम सोपा आणि मनोरंजक असावा याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. आधुनिक काळानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण दृष्टीने विकास घडवून आणणारी शिक्षण व्यवस्था असणे काळाची गरज होती. ती गरज नवीन शैक्षणिक धरणामुळे पूर्ण झाली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक बनविला गेला आहे आणि तांत्रिक ज्ञान आणि त्याचे व्यावहारिकप्रशिक्षण देखील समाविष्ट केले गेले आहे. त्याचा उहापोह सदर लेखात करण्यात आला आहे.

Downloads

Published

2016-2024

How to Cite

डॉ. संगीता बाबुराव भालेराव. (2024). राष्ट्रीय शैक्षणिक धोरि 2020: शालेय णशक्षिाची गुिवत्ता आणि राष्ट्रीय णिशन. Sampreshan, ISSN:2347-2979 UGC CARE Group 1, 17(3), 24–29. https://doi.org/10.8476/sampreshan.v17i3.258

Issue

Section

Articles