शहरी व ग्रामीण भागातील कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अभिवृत्तीचा तुलनात्मक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.8476/sampreshan.v17i2.252Abstract
वैज्ञानिक अभिवृत्ती म्हणजे कोणत्याही गोष्टीमागील कार्यकारणभाव जाणून घेणे होय. वैज्ञानिक अभिवृत्ती म्हणजे विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची व विशिष्ट पद्धतीने कृती करण्याची क्षमता होय. वैज्ञानिक वृत्ती म्हणजे जिज्ञासा, तर्कशुद्धता आणि तर्कशुद्ध विचार, ज्ञान शोधणे आणि सत्यापित ज्ञान वापरून समस्येचे निराकरण करणे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकावर असते.ज्ञान शांततापूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन ही आजच्या समाजाची गरज आहे. बहुसांस्कृतिक जगातील प्रत्येक व्यक्ती. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रशुद्धता असणे आवश्यक आहे.प्रस्तुत शैक्षणिक संशोधनामध्ये संशोधीकेने शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अभिवृत्तीचा अभ्यास केला. या अभ्यासासाठी संशोधीकेने शहरी आणि ग्रामीण भागातील कुम्रावास्थेतील विद्यार्थ्यांची नमुना म्हणून निवड केली. त्यानंतर माहितीचे संकलन एका स्वनिर्मित चाचणीने करून, संकलित माहितीवर प्रक्रिया करून निष्कर्ष काढले. शहरी आणि गरमी भागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अभिवृत्तीत लक्षणीय फरक असल्याचे आढळून आले.